Chinchwad : रक्तदान शिबिरात 43 रक्तदात्यांचा सहभाग
एमपीसी न्यूज- गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने गांधीपेठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
दिलीप सोनिगरा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी महादेव बोत्रे, डॉ. बारवकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वाय. सी. एम. हास्पिटल) रक्तपेढी कर्मचाऱ्यांचे सौजन्य लाभले. यावेळी रक्तदात्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
रक्त संकलनाच्या या कार्यात विपुल नेवाळे, राजू शिवतरे, गोपी बाफना, महेश गावडे, प्रज्ज्वल भळगट, नवनाथ सरडे, अनुप पाटील, ज्ञानेश्वर जाधव यांनी परिश्रम घेतले.