Talegaon Dabhade : गिफ्ट शॉपीचे शटर उचकटून हजारोंची रोकड लंपास
एमपीसी न्यूज – गिफ्ट शॉपी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 21 हजार रुपये चोरून नेले. ही घटना सोमाटणे येथे मंगळवारी (दि. 26) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.
दीपक वामन झाल्टे (वय 37, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांचे सोमाटणे येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी गिफ्ट शॉपी व स्टेशनरीचे दुकान आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील 21 हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.