Alandi : कंपनीतील मशिनरी विकत घेण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी; सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रबराच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मशिनरी विकत घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने त्यासाठी नकार दिला असता किरकोळ कारणांवरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना मरकळ रोड, आळंदी देवाची येथे घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती आणि सासरा या दोघांना रबर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सुरु करायची आहे. त्यासाठी मशिनरी घेण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. म्हणून आरोपींनी फिर्यादी महिलेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. फिर्यादी महिलेने त्यासाठी विरोध केला असता तिला घरकाम, स्वयंपाक व्यवस्थित येत नसल्याच्या तसेच चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत विवाहितेने आळंदी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.