Peth : आंबेगाव, पेठमधील नागरिकांशी आढळराव-पाटील यांनी साधला संवाद
एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज प्रचार दौऱ्यानिमित्त पेठ, आंबेगाव येथील गावांचा भेट दौरा केला. पेठ ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या ठिकाणी झालेल्या सभेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
- यावेळी त्यांच्यासोबत विजय शिवतारे, राज्यमंत्री जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, भाजपा संपर्कप्रमुख जयसिंगशेठ एरंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुण गिरे, उपसभापती राजु जवळेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, कल्पना आढळराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, भाजपा तालुका अध्यक्ष संजय थोरात, युवासेना विस्तारक सचिन बांगर, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर,शिवसेना नेते सुरेश भोर,पंचायत समिती सदस्य शीतल दोडके, भाजपा युवानेते डॉ.ताराचंद कराळे, उद्द्योजक लक्ष्मणराव काचोळे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष हेमलता मोरे, दिलीप पवळे, अशोक बाजारे आदी उपस्थित होते.