Nigdi : मॉडर्न शैक्षणिक संकुलामध्ये उद्यापासून वसंत व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – निगडी, यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलामध्ये वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 21 एप्रिलदरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते आपले विचार व्यक्त करणार आहेत.

मॉडर्नच्या प्रागंणात 15 ते 21 एप्रिलदरम्यान दररोज सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यान होणार आहे. मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या व्याख्यानमालेचे हे 27 वे वर्ष आहे.

सोमवार ( दि.15) प्रा.केशव उपाध्ये यांचे ‘आजचा मिडिया – समाजावर परिणाम’, तर मंगळवार (दि. 16) डॉ. ज्ञानेश्वर कुंभार यांचे ‘सामाजिक समरसता’, बुधवार (दि.17) ह.भ.प. संदीप मांडके यांचे कीर्तन होणार आहे. गुरूवार ( दि. 18) डॉ. सागर देशपांडे ‘आदर्शाच्या शोधात’, तर शुक्रवार (दि. 19) प्रसन्न देशपांडे यांचे ‘भारतीय संस्कृती – काल आज आणि उद्या’ , तर शनिवारी ( दि. 20 ) डॉ. दत्ता कोहिनकर यांचे ‘मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती’ आणि रविवारी (दि. 21 ) रोजी मोहनबुवा रामदासी – समर्थ रामदास या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत, असे संयोजक शरद इनामदार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.