Bhosari: भोसरीत सव्वा दोन लाखांची घरफोडी

A burglary of Rs 2 lakh in bhosari फिर्यादी धोत्रे यांचे घर 20 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे लॉक तोडून आत प्रवेश केला.

एमपीसी न्यूज – दिघी रोड भोसरी येथे एका सदनिकेत चोरी करत अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 26 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 20 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत राधानगरी हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी येथे घडली.

कमल दिगंबर धोत्रे (वय 60, रा. राधानगरी हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धोत्रे यांचे घर 20 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे लॉक तोडून आत प्रवेश केला.

घरातील कपाट उघडून त्यातून 14 तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, 11 ग्रामचे सोन्याचे बुगडी, कुडके, अंगठ्या, कानातील टोप्स आणि साडेचार तोळ्यांचे चांदीचे पैंजण असा एकूण दोन लाख 26 हजार 800 रुपयांचे दागिने चोरून नेले.

फिर्यादी कमल आजारी असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत रुग्णालयात दाखल होत्या. उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी बुधवारी (दि. 5) याबाबत गुन्हा नोंदवला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.