Pune news: प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

A case has been registered against a young man for making offensive remarks on social media about Prakash Ambedkar.

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. यााप्रकरणी मनोज क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुरज चव्हाण याने आपल्या फेसबुक प्रोफाईल च्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्यावर अश्लील टिपणी केली होती. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी लोकांना दिसेल अशा हेतूने पोस्ट करून प्रकाश आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे ही तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विभागाचे साहाय्यक पोलिस आयुक्त करीत आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.