Somatne : सोमाटणे फाटा येथील अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोमाटणे (Somatne) फाटा येथे बुधवारी (दि. 13) सकाळी भीषण अपघात झाला. जीपच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जीप चालकाच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Pimpri : रस्ते खड्डेमुक्तीसाठी समिती

अर्जुन शंकर शेळके (वय 38, रा. दळवीनगर, निगडी), भालचंद्र किसन आहेरकर (वय 38, रा. यमुनानगर, निगडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जीप गाडी (एमएच 12/व्हीके 8000) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मच्छिंद्र कांदळकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि भालचंद्र हे मोपेड दुचाकीवरून जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात होते. सोमाटणे फाटा येथील भोलेनाथ हॉटेल समोर आल्यानंतर कंपास जीपने मोपेड दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीचे मागील चाक आणि इंजिन तुटून पडले. जीपचे मोठे नुकसान झाले. तर दुचाकीवरील अर्जुन आणि भालचंद्र यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.