Tilak Road : टिळक रस्त्यावर भलं मोठं झाड कोसळलं, दोघे जखमी तर चार वाहनांचे नुकसान

एमपीसी न्यूज – पुण्यातील टिळक रस्त्यावरील (Tilak Road)  स. प. महाविद्यालयाजवळ एक लिंबाचं भलं मोठं झाड अचानक कोसळले.

 

मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. अचानक हे झाड कोसळल्याने टिळक रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. झाड कोसळल्याने त्या ठिकाणाहून जाणारे दोन ते तीन नागरिक जखमी झाले आहेत. तर टेम्पो आणि रिक्षाचे या घटनेत मोठे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.