Pimpri : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला फायटर व कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – तरुणाला गप्पा (Pimpri) मारायला बोलावून जुने भांडण उकरून काढत त्याला फायटर व कोयत्याने मारहाण करत जखमी केले आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी पिंपरी येथील नेहरूनगर येथे घडली.

या प्रकरणी अनिकेत दत्ता वाघमारे (वय 23 रा पिंपरी)  यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून (Pimpri) पोलिसांनी रोहित बागडे (वय 24 रा पिंपरी) याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार हितेश पारछा,अमित चंडालिया, नवीन वाल्मिकी व त्यांचे दोन ते तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Podcast : देशोदेशींचे आणि विविध धर्मांतील गणपती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रस्त्यावरून जात असताना हितेश व रोहित यांनी हाक मारून त्यांना जवळ बोलावले. फिर्यादी (Pimpri)आरोपी जवळ गेले, ते त्यांना गप्पा मारत असताना त्यांच्यात झालेल्या जुन्या भांडणाचा विषय निघाला.

याच रागातून हितेश व रोहित यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना पाहून इतर आरोपी देखील तेथे आले व त्यांनी फायटर व कोयत्याच्या साह्याने फिर्यादीला मारून जखमी केले. या घटनेनंतर फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर आरोपींचा पिंपरी पोलीस शोध घेत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.