Charholi : पार्किंगच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पार्किंगच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) दुपारी दीड वाजताच्या सुमारास साठेनगर, चऱ्होली (Charholi) बुद्रुक येथे घडली.

Chakan : हॉस्पिटल मधील पैशांचा अपहार; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

शिवप्रसाद मगर (वय 23, रा. साठेनगर, चऱ्होली बुद्रुक, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील राजकुमार मगर (वय 46) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण अविनाश रसाळ (वय 25), आशिष अविनाश रसाळ (वय 27), एक महिला (वय 45, सर्व रा. साठेनगर, चऱ्होली बुद्रुक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शिवप्रसाद हा रिक्षा चालवतो. तो मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास रिक्षा पार्क करून घरी येत होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवले. आरोपी प्रवीण याने शिवप्रसाद याला ‘तू माझी फोरव्हीलर गाडी अंगणवाडीच्या समोर पार्क करून देत नाही’ असे म्हणत शिवीगाळ केली. हा वाद सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ गेला असता त्यांना शिवीगाळ करून आरोपींनी हाताने मारहाण केली.

त्यांनतर शिवप्रसाद याला फरशीच्या तुकड्याने मारून जखमी केले. अन्य दोन आरोपींनी शिवप्रसाद याला शिवीगाळ करून काठीने मारले. शिवप्रसाद याला ढकलून दिल्याने त्यास जखम झाली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.