Chakan : हॉस्पिटल मधील पैशांचा अपहार; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हॉस्पिटलमध्ये जमा झालेली रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर घेऊन हॉस्पिटलची 12 लाख 50 हजार रुपयांची फसवणू केली. ही घटना 2 फेब्रुवारी 2022 ते 17 ऑक्टोबर 2022 या कालावधीत चाकण (Chakan) येथील क्रीटीकेअर हॉस्पिटल मध्ये घडली. याप्रकरणी 13 सप्टेंबर 203 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : भक्ती-शक्ती चौकातील वाहतुकीत शनिवारी बदल

राजेश नारायण घाटकर (वय 50, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीमान सुखदेव शिंदे (वय 26, रा. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वताच्या फायद्यासाठी फिर्यादी यांच्या हॉस्पिटलच्या अकाउंट मध्ये जमा झालेले सहा लाख 50 हजार रुपये स्वताच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले. तसेच हॉस्पिटल मध्ये बिल भरण्यासाठी लावलेल्या क्युआर कोडद्वारे रुग्णांच्या बिलातून सहा लाख रुपये आरोपीने स्वताच्या खात्यावर घेत हॉस्पिटलची 12 लाख 50 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वर्षभराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.