Maval : सुदूंबरे गावात आधारकार्ड कॅम्प संपन्न

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायत सुदुंबरे व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उमा राहुल शेळके यांच्या प्रयत्नातून 24 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान (Maval) आधार सेवा कॅम्प घेण्यात आला. गावातील महिला अस्मिता भवन याठिकाणी हा कॅम्प पार पडला. सुदुंबरे गावातील एक हजार 124 ग्रामस्थांच्या आधारकार्डचे काम या कॅम्पमध्ये करण्यात आले.

 

याप्रसंगी सुदुंबरे गावचे माजी आदर्श सरपंच माणिक मारुतराव गाडे, सुदुंबरे गावचे माजी उपसरपंच जालिंदर जगन्नाथ गाडे, माजी उपसरपंच ताराचंद गाडे,माजी उपसरपंच विश्वनाथ ज्ञानेश्वर आंबोले, सुदूंबरे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या उमाताई राहुल शेळके उपस्थित होते.

 

Chinchwad News : शहरात प्रथमच रंगणार राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा

 

गावातील लोकांची होणारी गैरसोय तसेच लहान बालकांचे,अबाल वृद्धांचे व विद्यार्थ्यांचे आधारकार्डचे काम या कॅम्पद्वारे व्यवस्थितरित्या करून देण्यात आले.(Maval) याप्रसंगी आधारकार्ड सेवा केंद्राच्या व्यवस्थापिका स्वपना सचिन वामन तसेच त्यांच्या सर्व टिमने अतिशय परिश्रम व कर्तव्यनिष्ठपणाने हे काम बजावले त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.आधारकार्ड सेवा केंद्राचा लाभ घेतलेल्या व्यक्तींनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.