Alandi : आळंदी नगरपरिषदेच्या शाळेमध्ये जागतिक चिमणी दिवस साजरा

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत आळंदी नगरपरिषदेमार्फत (Alandi) मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या शाळेमध्ये जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
पालिकेच्या शाळेतील मुलीने जागतिक चिमणी दिवसानिमित्त चिव चिव चिमणे गाणे गायले. तसेच, शाळेतील मुलांनी यावेळी उन्हामध्ये पक्ष्याच्या संवर्धनासाठी धान्य आणि पाणी यांची सोय केली. असे विविध उपक्रम शाळेत राबवले. तसेच पालिका शाळेतील सर्व शिक्षकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
Chinchwad News : शहरात प्रथमच रंगणार राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा
जागतिक चिमणी दिनानिमित्त आळंदीतील अरुण बडगुजर यांच्या खांद्याजवळील पाठीवर चिमणी बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत माहिती विठ्ठल शिंदे यांनी दिली.