Akurdi News : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेलया 19 बाधितांना अडीच लाखांची मदत

बाधितांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेलया अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या हद्दीतील 19 बाधित नागरिकांना एकूण अडीच लाखांची नुकसान भरपाई शासनाकडून मंजूर करण्यात आली होती. ही रक्कम संबंधित बाधीत नागरिकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गीता गायकवाड यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळाचा अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या हद्दीतील आठ गावांना फटका बसला होता. त्यावेळी संबंधित गावातील तलाठ्यांकडून पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने बाधितांना नुकसान भरपाई अदा केली.

चक्रीवादळात घरांचे पत्रे , कौले, छत उडून गेले होते. घरांचे नुकसान झालेल्या नऊ बाधितांना प्रत्येकी 10  हजारांची नुकसान भरपाई देण्यात आली. संपूर्ण घराची पडझड झालेल्या नऊ बाधितांना कपडे आणि भांडी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांचे साहाय्य करण्यात आले.

तर चक्रीवादळात झाड कोसळल्याने किवळे, देहूरोड येथील एका शेतकऱ्याच्या दुभत्या गाईचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्याला 30  हजारांची नुकसान भरपाई देण्यात आली.

देहूगावातील सर्वाधिक 7  किवळे (4), चिखली आणि भोसरी येथील 2 , तर चिंचोली, डुडुळगाव, मोशी, रावेत या गावातील प्रत्येकी एका बाधिताला नुकसान भरपाई देण्यात आली.

चक्री वादळाच्या मुसळधार पावसात शेतातून गाय घेऊन घराकडे येत असताना वाटेतच एक मोठे झाड माझ्या दुभत्या गाईवर कोसळे. त्यात गाय जागीच गतप्राण झाली. दुग्धव्यवसाय बंद झाला आणि आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र,  तलाठी अतुल गीते यांनी तातडीने पंचनानामा केला.  तहसीलदार गीता गायकवाड यांनी शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन मला मानसिक आधार दिला. अखेर मला 30 हजारांची मदत मिळाली. त्यामुळे मी तलाठी अतुल गीते आणि तहसीलदार गीता गायकवाड यांचा कायम ऋणी आहे.

श्रीरंग दांगट- बाधित शेतकरी, किवळे-देहूरोड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.