Maharashtra Corona  Update  : महाराष्ट्रात आज 10 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी  न्यूज  – महाराष्ट्रात आज 10 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण 14 लाख 55 हजार 107 करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 88.78 टक्के इतका झाला आहे.

आज महाराष्ट्रात 6 हजार 417 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर राज्यात मागील 24 तासांमध्ये 137 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या 2.63 टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात 137 करोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 85 लाख 48 हजार 36 रुग्ण नमुन्यांपैकी 16 लाख 38 हजार 961 इतके नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 25 लाख 3 हजार 510 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 14 हजार 170 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात 1 लाख 40 हजार 194 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात मागील 24 तासात 6 हजार 417  नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या 16 लाख 38 हजार 961 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III