Ravet News : नदी पात्रातील अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पवना नदी पात्रातील जाधवघाट रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई केली. 4 आरसीसी बांधकामे, 11 पत्राशेड व 1 वीट बांधकामावर कारवाई करण्यात आली. बुधवारी केलेल्या कारवाईत 3 हजार 444 चौरस मीटर अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात आहे. दररोज शहराच्या विविध भागात कारवाईचा धडाका सुरु आहे. पत्राशेड, बांधकामे भुईसपाट केली जात आहेत. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पवना नदी पात्रातील जाधवघाट रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

सह शहर अभियंता मकरंद निकम मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अभियंता संजय भोसले यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. उप अभियंता दीपक करपे, कनिष्ठ अभियंता मनाली स्वामी, प्रवीण धुमाळ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिनेश नेहरकर, अमोल पवार, इतर कर्मचारी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका पोलीस, रावेत ठाण्याचे तीन पोलीस उपनिरीक्षक, 20 पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य पोलीस सुरक्षाबलाचे 20 कर्मचारी असा तगडा बंदोबस्त होता.

मजूर, जेसीबी, पोकलेन, जॉकटरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.