Crime news : पोलिसांची मनाई झुगारून दहशत पसरवल्याने गुन्हेगार शाहरुख खान वर कारवाई

एमपीसी न्यूज : पोलिसांची मनाई झुगारून वाढदिवसाला गुन्हेगार जमा केल्या प्रकरणी गुन्हेगार शाहरुख खान वर कारवाई करण्यात आली आहे.(Crime news) त्याने आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह चौघांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे विरोधी पथकाने केली आहे.

शाहरुख खान, वय 29 वर्षे, रा. काळा खडक वाकड, सोन्या उर्फ आशिष गोयर, वय 29 वर्षे, रा. थेरगाव, दीपक धोत्रे, वय 24 वर्षे, रा. निगडी व कुलदीप बिराजदार, वय 24 वर्षे, रा. राहटणी या चार आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.

याबाबत माहिती देताना, अंबरीश देशमुख, सहाय्य्क  पोलीस निरीक्षक, शस्त्र विरोधी पथक व  गुंडा विरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभार म्हणाले की, सराईत  गुन्हेगार शाहरुख खान याने 7 नोव्हेंबरला रात्री वाकड येथील एका कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे फोटो व रील्स  मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर दहशत बसविण्यासाठी व्हायरल करण्यात आले होते. या कार्यक्रमाला 300 ते 400 लोक जमा झाले होते.

Lok adalat : जिल्ह्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

या वाढदिवस कारखाना विषयी अधिक तपास करत असताना कळाले की, आरोपी शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर व चष्मे वाटप कार्यक्रमासाठी वाकड पोलीस ठाण्याकडे परवानगी अर्ज 6 नोव्हेंबर ला दिला होता. पण पोलिसांनी ती परवानगी नाकारली होती.(Crime news) तसेच पाच पेक्षा जास्त लोक वाढदिवस समारंभात असू नयेत असे सांगण्यात आले होते. जर वाढदिवस  कार्यक्रमामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते.

त्यामुळे शाहरुख खान सह चार जणांवर भादवि कलम 188 व जमाबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.