Lok adalat : जिल्ह्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, (Lok adalat) नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. 

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम 138 निगोशिएबल इन्स्टुमेंट्स अॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे मोठया प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा यांचेकडील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे, बीएसएनएल, आयडिया व्होडाफोन, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, आदींकडील बाकी असलेली देयके इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या मागील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 8 हजारपेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढत पुणे जिल्ह्याने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे.(Lok adalat) लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये जिंकल्याची भावना निर्माण होते तसेच दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. या लोकअदालतमध्ये अद्यापही ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे घेऊन तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा आहे त्या पक्षकारांनी आपापल्या न्यायालयात अर्ज करुन विनंती करावी. किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुक्याचे ठिकाणी तालुका विधी सेवा समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा. जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती मंगल दीपक कश्यप यांनी केले आहे.

Pune crime : आवाजवी दराने कर्ज देणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

 

सात लोक अदालतीतील ठळक नोंदी

-12 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या लोक अदालतीत 13 हजार 561 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 5 हजार 226 प्रलंबित तर 8 हजार 335 दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-1 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या लोक अदालतीत 33 हजार 61 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 15 हजार 562 प्रलंबित तर 17 हजार 499 दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-25 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या लोक अदालतीत 3 लाख 17 हजार 836 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 8 हजार 963 प्रलंबित तर 3  लाख 8 हजार 873 दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-11डिसेंबर 2021 रोजी झालेल्या लोक अदालतीत 2nलाख 60 हजार 415  प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 8 हजार 771 प्रलंबित तर 2 लाख 51 हजार 644 दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-12 मार्च 2022 रोजी झालेल्या लोक अदालतीत 46 हजार 659 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 16 हजार 695 प्रलंबित तर 29 हजार 964 दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-7 मे 2022 रोजी झालेल्या लोक अदालतीत 32 हजार 96 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 11 हजार 78 प्रलंबित तर 21 हजार 18 दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-13 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या लोक अदालतीत 8 हजार 18 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 3 हजार 4 प्रलंबित तर 5 हजार 14 दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.