Pune crime : आवाजवी दराने कर्ज देणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज अवाजवी दराने कर्ज देणाऱ्या सावकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथक दोन यांनी केली आहे.(Pune Crime ) संबंधीत सावकार हा दिवसाला 15 हजार रुपये दंड व 10 टक्के असे मुघली स्वरूपाच्या व्याजदराने कर्ज देत असे.

प्रसाद किसन कुतळ (वय 45 रा.रास्ता पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे.

Chakan encroachment : संग्रामदुर्गातील मशिदी समोरील अतिक्रमणावर कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने कुतळ यांच्याकडून गरजेपोटी 5 लाख रुपये 10 टक्के व्याजदराने घेतले होते. त्याची परतफेड म्हणून कर्जदाराने 5 लाख 95 हजार रुपये दिले देखील.(Pune crime) मात्र सावकाराने 15 हजार रुपये प्रतिदिन दंड असे एकूण 18 लाख 10 हजार रुपयांची अवाजवी रक्कम मागीतली. त्यामुळे तक्रारदाराने थेट पोलीसात धाव घेत सावकाराविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.