Anupam Kher Welcomes Rafale: राफेलच्या आगमनाने अनुपम खेर आनंदित

Actor Anupam Kher welcomes Rafale aircraft राफेल भारतीय जमिनीवर उतरलं आहे. वायुसेनेला भरभरुन शुभेच्छा. आता आपण आणखी शक्तिशाली झालो

एमपीसी न्यूज – भारताच्या सैन्याला ताकद देण्या-या शक्तिशाली अशा पाच राफेल फायटर विमानांचं अखेर बुधवारी (दि.30) भारताच्या अंबाला येथील हवाईदलाच्या तळावर लँडिंग झालं आहे. ही विमाने बुधवारी दुपारी दूरचा पल्ला पार करुन भारतभूमीवर सुरक्षित उतरली. गेल्या दोन वर्षांपासून या विमानांची चर्चा होती. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ट्विट करुन सर्वप्रथम ही खूशखबर देशवासियांना दिली.

राफेल विमाने भारत भूमीवर उतरल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांचं स्वागत केलं आहे. ‘ओ रामजी माझ्या घरात राफेल आलं’, अशा आशयाचं ट्विट करुन अनुपम खेर यांनी राफेल विमानांचं कौतुक केलं.

याशिवाय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने देखील राफेलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘राफेल भारतीय जमिनीवर उतरलं आहे. वायुसेनेला भरभरुन शुभेच्छा. आता आपण आणखी शक्तिशाली झालो’, अशा आशयाचे ट्विट करुन त्याने आनंद व्यक्त केला आहे. या दोन्ही कलाकारांची ट्विट्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.


सुरक्षेच्या कारणासाठी राफेल विमाने अरबी समुद्रावरुन मुंबई व गुजरातच्या हद्दीतून अंबाला येथे पोहोचली. सर्वप्रथम त्यांनी मुंबई येथे भारताच्या हद्दीत प्रवेश केला. राफेलची तुकडी हिंदी महासागर क्षेत्रात दाखल होताच, नौदलाने राफेलच्या वैमानिकांना ‘हॅप्पी लँडिंग’च्या शुभेच्छा दिल्या.

यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौकेबरोबर संपर्क साधला.


पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. त्यानंतर हवाईदलाच्या परंपरेनुसार त्यांना वॉटर सॅल्यूट करण्यात आला. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.