Ashutosh Bhakre: अभिनेता आशुतोष भाकरे याची गळफास घेऊन नांदेड येथे राहत्या घरी आत्महत्या

 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख ही त्याची पत्नी आहे.

एमपीसी न्यूज – मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांने नांदेड येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली.  ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख ही त्याची पत्नी आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीय. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आशुतोषने ‘भाकर’ आणि ‘इचार ठरला पक्का’ सिनेमातून काम केले आहे.

आशुतोष हा गेले काही दिवस तो तणावातून जात होता. काही दिवासांपूर्वी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये लोकं आत्महत्या का करतात ? हा आशय होता. पण आशुतोष या निर्णयापर्यंत जाईल असा कोणी अंदाज लावला नव्हता.

लॉकडाऊनपासून मयुरी आणि आशुतोष नांदेड येथेच त्यांच्या घरी राहात होते. बुधवारी दुपारी मयुरी आणि आशुतोषची आई घरातील दिवाणखान्यात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या मजल्यावर झोपला होता. बराच वेळ झाला तरी तो उठला नाही म्हणून त्याला उठवण्यासाठी गेले असता त्याच्या रुमचे दार आतून बंद होते. खिडकीतून बघितले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

अभिनेत्री मयुरी देशमुख ही ‘खुलता खळी खुलेना’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचली. तसेच आशुतोषने देखील काही मराठी चित्रपटात काम केले होते. 21 जानेवारी 2016 ला मयुरी आणि आशुतोष यांनी लग्न केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.