Maharashtra Corona Update : आज 9,211 नव्या रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 4 लाखांवर

कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 59.84 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्याने आज कोरोना रुग्णांच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासांमध्ये 9,211 रुग्णांची वाढ झाली. राज्यात आज 7478 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर 298 रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 651 एवढी झाली आहे. त्यापैकी 1,46,129 सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील 2,39,755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट 59.84 एवढा झाला आहे. राज्यात आज 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या 14,463 वर जाऊन पोहचली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या  20,16,234 नमुन्यांपैकी 4,00,651 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 8,88,623 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 40,777 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 298 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.61 टक्के एवढा आहे.

मुंबईत मंगळवारी 28 जुलै 2020ला एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या घेण्यात आल्या, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. मुंबईतला रुग्ण वाढीचा सरासरी दरही आता 1 टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी देखील आता 70 दिवसांच्या पार गेला असून सक्रिय रुग्णांची संख्याही 18 हजारापेक्षा कमी झाली आहे. मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.