Chinchwad : अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री, धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Chinchwad) या प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात आल्या. ढोल ताशा व लेझीमच्या गजरात तसेच माधुरी दीक्षित यांनी साकारलेल्या विविध भूमिकेतील वेशभूषा केलेल्या महिलांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी चिंचवड येथे माधुरी दीक्षित यांची भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड शहरवासियांकडून झालेले अनोखे स्वागत पाहून त्या भारावून गेल्या.

आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने पंचक चित्रपटाच्या प्रीमियर शोचे चिंचवड मधील एका मॉल मध्ये आयोजन करण्यात आले. माधुरी दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्यासह डॉ. श्रीराम नेने, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान व इतर कलाकार या वेळी उपस्थित होते. अतुल परदेशी, संगीता तरडे व कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते अभिनेत्री माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांचा पुणेरी पगडी आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; विठ्ठल शिंदे यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी

अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी साकारलेल्या विविध भूमिकेतील वेशभूषा केलेल्या महिला पाहून माधुरी दीक्षित यांनी आनंद व्यक्त केला. माधुरी दीक्षित यांच्या प्रतिमेची (Chinchwad) रेखाटलेली भव्य रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. ढोल ताशा व लेझीम यांच्या गजरात उपस्थित पंचक चित्रपटातील कलाकारांचे स्वागत करण्यात आले. माधुरी दिक्षित यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.