Bhosari News : रिक्षाच्या संपानंतर आता भोसरी येथे रॅपीडो विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

एमपीसी न्यूज –अवघ्या काही दिवसात पुणे शहरात रॅपीडो (रोपन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस प्रा.लि.) राईड भरपूर प्रमाणात वाढल्या. यामध्ये तुम्ही अपद्वारे रिक्षा किंवा कॅब प्रमाणे दुचाकी बुक करु शकता. याचा सर्वात मोठा फटका रिक्षा चालकांना बसला ज्यामुळे काल (सोमवारी) पुणे व पिंपरी-चिंचवड येथे रिक्षा चालकांनी संप पुकारला. या संपा नंतर सोमवारी (दि.28) आता एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहनचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून रॅपिडो कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC RTO : ‘फेकू अधिकारी’ म्हणत आरटीओ अधिकारी अजित शिंदेंना रिक्षा चालकांकडून साष्टांग दंडवत

पोलीस तक्रारीत म्हटल्यानुसार, रॅपिडो या खासगी वाहतूक कंपनीला महाराष्ट्रात राज्य शासनाने व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी वाहतूकीचा परवाना दिलेला नाही. असे असताना देखील कंपनी त्यांच्या अपद्वारे दुचाकी चालकांना व प्रवाश्यांना ते कायदेशीर असल्याचे भासवून प्रवासी वाहतूक करवून घेतली. त्यांची फसवणूक करत कंपनीने स्वतःचा आर्थिक फायदा साधला. त्यामुळे कंपनी विरोधी भादवी क्र 418, मोटार वाहक कायदा कलम 66 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 2000 चे 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

कमी दर, वाहतूक कोंडीतूनही त्वरीत सुटका, उपलब्धता यामुळे रॅपिडो हे ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. मात्र कायदेशीर बाबीमध्ये कंपनी आता अडचणीत सापडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.