Pimpri News: महापालिका पर्यावरणपूरक वीट बनविण्यासाठी उद्यानातील पालापाचोळा देणार

एमपीसी न्यूज – मृतदेहाचे दहन करण्यासाठी महापालिका पर्यावरण पूरक वीट उपलब्ध करून देणार आहे. पर्यावरणपूरक वीट बनविण्यासाठी आरोग्य विभाग उद्यानातील पालापाचोळा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मशानभूमीत मृतदेहाचे दहन करण्यासाठी काही ठिकाणी विद्युतदाहिनी तर काही ठिकाणी लाकडाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असल्याने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी पर्यावरण पूरक वीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची बदली झाल्यानंतर हा प्रस्तावाचे काम खूपच संथ झाले होते. पर्यावरणपूरक वीट उपलब्ध करून देण्यासाठी पाच संस्थांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांचे दर जास्त असल्याने आरोग्य विभाग पालिकेच्या उद्यानातील पालापाचोळा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.

Bhosari News : रिक्षाच्या संपानंतर आता भोसरी येथे रॅपीडो विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

महापालिकेच्या शहरातील विविध भागात स्मशानभूमी आहेत. मृतदेह जाळण्यासाठी तीन ते चार ठिकाणी विद्युत दाहिनी तर इतर स्मशानभूमीत लाकडांचा वापर करण्यात येतो. मृतदेहाचे दहन करण्यासाठी महापालिका पर्यावरण पूरक वीट उपलब्ध करून देणार आहे. यासाठी पालिकेने कोटेशन मागविले होते. या प्रस्तावासाठी पाच संस्थांनी इच्छा व्यक्त करून कोटेशन पाठविले आहेत. काही संस्थांनी एका मृतदेहासाठी साडेपाच हजार रूपये दर दिला आहे. तर काही संस्थांनी पर्यावरण पूरक वीटसाठी प्रति किलो साडेसहा, साडेनऊ रूपये असा दर दिला आहे.

याबाबत आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर म्हणाले, मृतदेह दहन करण्यासाठी पर्यावरणपूरक वीट उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी कोटेशन मागविले होते. यामध्ये दर जास्त वाटत आहे. महापालिकेची 184 उद्याने आहेत. या उद्यानातील पालापाचोळा पर्यावरणपूरक वीट तयार करण्यासाठी देण्याचा महापालिकेचा मानस आहे. पुण्यातील जे. पी. एंटरप्रायजेस ही संस्था पालिकेला जशी अपेक्षित आहे तशी वीट बनवत आहे. कोणत्या संस्थेला काम द्यावयाचे याचा अद्याप निर्णय झाला नसून येत्या काही दिवसात निर्णय करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.