Ag Detection Kit: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका खरेदी करणार साडे चार कोटींची किट

Ag Detection Kit: PMC will buy a kit worth Rs 4.5 crore on the amid Corona pandemic

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका एका कंपनीकडून सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या Ag Detection Kit खरेदी करणार आहे. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पुणे शहरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे किट कोरोना रुग्णांसाठी तातडीने पुरविणे गरजेचे झाले आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत कालमर्यादा विचारात घेता नियमानुसार निविदा मागवून हे किट खरेदी करणे अशक्य आहे. पुणे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आणि कंटेन्मेंट झोनमध्ये हे किट वापरण्यात येणार आहे. 1 लाख किट प्रति दर 450 रुपये प्रमाणे 4 कोटी 50 लाख रुपये देऊन खरेदी करण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या तसेच अतिजोखिमिच्या व्यक्तींच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या व इतर हृदय विकार, फुफुस, यकृत, मूत्रपिंड विकार, मधुमेह, रक्तदाब आदी विकार असलेल्या तसेच, कमो थेरपी, एचआयव्ही पॉझिटिव्ह, अवयव प्रत्यारोपण, केलेल्या, वयोवृद्ध व्यक्तींवर, गरोदर महिलांवर तातडीने उपचार करण्यासाठी, रुग्णालयात आंतररुग्ण भरतीसाठी तातडीची चाचणी करण्यासाठी SD Biosensor या कंपनीच्या Standard Q Covid – 19 Ag Detection Kit द्वारे तपासणी करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

एका टेस्टची किंमत प्रति टेस्ट 450 रुपये निश्चित करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्याची आवश्यकता भासल्यास संबंधित आयुक्त महापालिका क्षेत्रात हे किट खरेदी करू शकतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.