Pune : रवींद्र धंगेकर अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलतात; हेमंत रासने यांचा आरोप

एमपीसी न्यूज : राज्य सरकार मार्फत कसबा विधानसभा (Pune) मतदारसंघातील पायभूत सुविधा करिता 10 कोटींचा निधी मंजूर झाला होता.

मात्र तो निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघामध्ये वळविण्यात आला आहे. यामागे भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी लवकरात लवकर 10 कोटींचा निधी न दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला होता.

त्या आरोपांना काही तास होत नाही.तोवर भाजपचे नेते हेमंत रासने (Pune) यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की,आमदार रवींद्र धंगेकर हे अपुर्‍या माहितीच्या आधारे बोलत आहेत.जिल्हा नियोजन आणि नगरविकास विभागाच्या कामांचा कोणताही संबंध नाही.त्यामुळे त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन बोलावे.

अशा शब्दात आमदार रवींद्र धंगेकर यांना भाजप नेते हेमंत रासने यांना टोला लगावला.

यावेळी हेमंत रासने म्हणाले की,चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना समान न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.

कोणावरही अन्याय करण्याची त्यांची भूमिका नसते. जिल्हा नियोजन मधून सन 2022-23 मध्ये लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे निधीचे वाटप झाले आहे. त्यामुळे अपूऱ्या माहितीच्या आधारे आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

जिल्हा नियोजन आणि महापालिकेच्या माध्यमातून नगरविकासकडून करण्यात येणाऱ्या कामांचा कोणताही संबंध नाही.कसबा मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ आहे.त्यामुळे येथील बहुतांश कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून महापालिका करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune : राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार : महादेव जानकर

तसेच ते पुढे म्हणाले की,दिवंगत आमदार मुक्ताताई यांनी आपल्या कार्यकाळात जी कामे दिली होती. त्या कामाचा निधी मंजूर झाला होता. त्यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर निवडून आल्यानंतर त्यांनीही त्यांचीच कामे आपल्या नावाने दाखवून श्रेय लाटण्याचा प्रकार धंगेकर करत आहेत,असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.