Dragon Fruit News : गुजरात सरकारनं दिलं ‘ड्रॅगन फ्रूट’ला नवं नाव!

एमपीसी न्यूज – ड्रॅगन फ्रूटला आता ‘कमलम’ हे नाव देण्याचे गुजरात सरकारने ठरवले आहे. या फळाचा बाह्य भाग हा कमळाच्या आकारासारखा दिसत असल्याने त्याला ‘कमलम’ हे नाव देणार असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सांगितले आहे.

ड्रॅगन फळाला गुजरातमध्ये यापुढे कमलम या नावाने ओळखले जाणार आहे. या फळाचे नाव हे चायनाशी संबंधित असून आता आम्ही ते बदलले आहे. यांमध्ये काही राजकारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. कमळाला संस्कृत भाषेत ‘कमलम’ असे म्हणतात.

अगदी कमी कालावधीत या फळाने लोकप्रियता मिळवली आहे. या फळाचा आकार आणि चव यांमुळे ते नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. या फळामध्ये विटामीन ‘सी’चे प्रमाण अधिक असून याचे अनेक फायदे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.