Ajit Pawar : ‘त्या’ शंका कुशंका डोक्यातून काढा-अजित पवार

एमपीसी न्यूज-शिंदे फडणवीस सरकार विरोधात सुप्रीम (Ajit Pawar) कोर्टाचा निर्णय गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जातील अशी चर्चा सुरू असताना,त्यावर अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच समोर येऊन भूमिका मांडली.पण आज मुंबईतील कार्यक्रमास अजित पवार हे उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की,मी राजकीय जीवनात जवळपास 30 वर्षापासुन आहे.अनेक कार्यक्रम ठरलेले असतात.काही कार्यक्रमांना जाता येत किंवा जाता येत नाही.त्यामुळे विनाकारण गैरसमज निर्माण करू नका.त्या शंका कुशंका डोक्यातून काढा.आजची मिटिंग आणि ‘सकाळ’चे खूप दिवसापूर्वीचे नियोजन होते, अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

Alandi News :आळंदीत मद्यपींमुळे नागरिकांना त्रास

राज्य सरकारच्या माध्यमातुन महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू झाल्यापासून आजपर्यंत कधी ही कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला नाही.पण या पुरस्कार सोहोळ्यासाठी 13 कोटींचा खर्च झाल्याची चर्चा आहे. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिली नाही. त्यामुळे काही निष्पाप नागरिकांचा बळी गेला.त्यावर राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भूमिका मांडत नाही.त्यामुळे खारघर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी राज्यपाल रमेश बैस (Ajit Pawar) यांच्याकडे केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.