Akurdi : राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – चारुशीला कुलकर्णी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कॅरम असोसिएशन ऑफ पुणे व उत्कर्ष कॅरम अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शनिवार (दि. 1 सप्टेंबर) ते सोमवार (दि. 3 सप्टेंबर) या कालावधीत आकुर्डी येथे होणार आहेत.

आकुर्डी मधील बजाज ऑटो समोर श्रमशक्ती भवन येथे होणा-या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागातून चारशेहून अधिक खेळाडू तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू सहभाग घेणार आहेत. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 1 लाख 10 हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सुमारे 10 वर्षानंतर पुण्यात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत मागील वर्षी राज्य मानांकन मिळालेले खेळाडू देखील सहभाग घेणार आहेत. त्यामध्ये पुरुष गटात योगेश धोंगडे (मुंबई), मोहम्मद गुर्फान (मुंबई), अनिल मुंढे (पुणे), विकास धारिया (मुंबई), प्रशांत मोरे (मुंबई), पंकज पवार (मुंबई), ज़ैद अह्मद (ठाणे), अमोल सावर्डेकर (मुंबई) आणि महिला गटात काजल कुमारी (मुंबई), मिताली पिंपळे (मुंबई), संगीता चांदोरकर (मुंबई), प्रीती खेडेकर (मुंबई), मैत्रेयी गोगटे (मुंबई), नीलम घोडके (मुंबई), ऊर्मिला शेंडगे (मुंबई), जान्हवी मोरे (मुंबई) आदी सहभाग घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.