Akurdi : गुरुपौर्णिमेनिमित्त आकुर्डी येथे उद्या कृतज्ञता दिन कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या (Akurdi) गुरुबद्दल आपणही कृतज्ञता व्यक्त करावी, या हेतूने गुरुपौर्णिमेनिमित्त जीवन विद्या मिशन पिंपरी – भोसरी यांच्यातर्फे आकुर्डी येथे उदया (रविवारी) कृतज्ञता दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सद्गुरु वामनराव पै यांचे सतशिष्य दशरथ शिरसाठ हे मानवी जीवनातील सद्गुरूंचे आढळ स्थान या विषयावरती प्रबोधन करणार आहेत.

हा कार्यक्रम आकुर्डी येथील खंडोबा मंदिराशेजारील खंडोबा सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि.2) दुपारी साडेचार ते रात्री नऊ या वेळेमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये साडेचार ते साडेपाच या वेळेमध्ये हरिपाठ, उपासना, यज्ञ, संगीत, जीवन विद्या तर सायंकाळी साडेपाच ते साडेसहा यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सुखसंवाद याचे आयोजन केले आहे.

तर साडेसहा ते सात या वेळेमध्ये सद्गुरूंचे पूजन सायंकाळी सात ते आठ या वेळेमध्ये प्रबोधन व रात्री आठ ते नऊ या वेळेमध्ये अनुग्रह व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांमध्ये नागरिकांना सद्गुरु विषयी व त्यांच्या उपक्रमाविषयी माहिती व ज्ञान मिळणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांना ज्ञानसाधना केंद्र पिंपरी भोसरीचे अध्यक्ष अमर गावडे 985065010 व सचिव नारायण सांबरेकर 9860546270 किंवा खजिनदार भाऊसाहेब देशमुख 9420100899 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Maval : मावळातून पाच हजार लिटर हातभट्टीची दारूचे रसायन जप्त

नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यशाचा, शांतीचा मार्ग मिळावा (Akurdi) यासाठी जीवन विद्या मिशनतर्फे अनेक सामाजिक उपक्रम घेतले जातात. ज्यामध्ये संस्कार शिक्षणा अभियान,व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन अभियान, अवयव दान अभियान, कृषी समृद्धी अभियान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व संवर्धन अभियान, ग्राम समृद्धी अभियान, विद्यार्थी मार्गदर्शन अभियान या साऱ्या समाज उपयोगी उपक्रमांचा समावेश होतो.

तरी नागरिकांनी या कृतज्ञता दिनाचा लाभ घेत जास्तीत जास्त उपस्थिती नोंदवावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.