Chinchwad : तीन वर्षाच्या खडतर मेहनतीनंतर चिंचवडचा अथर्व ओझर्डे होणार सैन्यात दाखल

एमपीसी न्यूज : तीन वर्षाचे एनडीएमधील खडतर प्रशिक्षण (Chinchwad) घेतल्यानंतर चिंचवड येथील रहिवासी अथर्व राजेश ओझर्डे देशाच्या संरक्षणासाठी दाखल होणार आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरातील सर्वांकडून त्याचे कौतुक होत आहे.

 

अथर्वचे शिक्षण सेंट अँड्र्यूज, चिंचवड येथून झाले असून लहानपणापासून लष्करात भरती होण्याचे आकर्षण होते. अथर्वने एनडिएची लेखी व मुलाखतीचे प्रशिक्षण स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, प्राधिकरण येथून घेतले. ब्रिगेडियर बलजितसिंग गील सर व तेथील शिक्षकांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. अथर्वच्या घरातून कोणताही लष्कराचा वारसा नाही. पुढील हवाईदलाच्या प्रशिक्षणासाठी एअरफोर्स अकडमी (AFA) हैद्राबादमध्ये दाखल झाला आहे.

Akurdi : गुरुपौर्णिमेनिमित्त आकुर्डी येथे उद्या कृतज्ञता दिन कार्यक्रमाचे आयोजन

 

अथर्वचे वडिल राजेश ओझर्डे हे सेको टूल्स कंपनीमध्ये असून आई (Chinchwad) वर्षा ओझर्डे ह्या गृहिणी आहेत व बहिण अदिती ओझर्डे शालेय शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबीयांनी देखील मुलांच्या स्वप्नांना साथ द्या, ते नक्की तुम्हाला यश संपादन करून दाखवतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.