Maval : मावळातून पाच हजार लिटर हातभट्टीची दारूचे रसायन जप्त

एमपीसी न्यूज – मावळातील आढले (Maval) गावातून शिरगाव पोलिसांनी 5000 लिटर गावठी हातभट्टीची  दारूचे रसायन जप्त केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तीन महिला आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिसांनी आढले बुद्रुक या गावातील ओढ्यालगत गुरुवारी(दि.29) सायंकाळी केली. या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन काचोळे यांनी शुक्रवारी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi : निगडीतील टँकर दुर्घटनेवर नियंत्रण मिळविणाऱ्या साहसी वीरांचा महापालिकेतर्फे सन्मान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलिसांनी छापा टाकत ओढयालगत महिला आरोपीकडून 5000 लिटर गावठी हातभट्टीची दारू करण्याचे रसायन व इतर साहित्य असा एकूण तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

मात्र, या कारवाईत महिला आरोपी या फरार झाल्या आहेत. शिरगाव पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.