Akurdi : डॉ. डी. वाय.पाटील.कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी येथे चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लुपिन कंपनीचे सहाय्यक संचालक डॉ. समिरॉन फुकान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, प्लेसमेंटच्या प्रमुख जस्मिता कौर, मुकेश मोहिते, विद्यार्थी प्रतिनिधी सलोनी कडू, देवेंद्र गोरेले आदी उपस्थित हाेते.

प्रमुख पाहुणे डॉ. फुकान यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित केल्यावर त्याला यशापर्यंतची वाटचाल करताना स्मार्ट परिश्रम करा. जे कराल त्यात नाविन्यपूर्णता असावी. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास संपला तरी शिक्षण क्षेत्रातला प्रवास अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. यासाठी तणावावर मात करुन आपले लक्ष्य गाठावे. तसेच स्वतःला विकसित करण्यासाठी वेळ द्यावा, असे प्राचार्य डॉ. व्यवहारे त्यांनी नमुद केले.

  • यावेळी प्राची कुलकर्णी, रुतुजा बांदल, देवेंद्र गोरेले, प्राजक्ता लोखंडे, रूपली बिरादार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निरोप समारंभ कार्यक्रमात राजू माने यांना गेल्या चार वर्षांत उत्कृष्ट कामगिरीसाठी “सर्वोत्कृष्ट विद्यार्थी” पुरस्कार देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात रूपाली बिरादार हिला सर्वाधिक हजेरीसाठी सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार, निकिता हांडगे,राजू माने यांना सर्वोत्तम विद्यार्थी (क्रीडा), देवेंद्र गोरले, प्रतिक्षा कळमकर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार,प्रज्ञा गिग्यु, अभिषेक स्वामी यांना उत्कृष्ट निवेदक म्हणून पुरस्कार प्रदान केला.

  • सिमरन शेख हिला उत्कृष्ट गायिका म्हणून उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार आणि सर्वोत्तम वर्ग पुरस्कार असे ५० प्रकारचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी जगेतिया आणि सौरभ आन्नदाते या विद्यार्थ्यांनी केले. आभार अभिषेक स्वामी याने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.