Nigadi : पं. बिरजू महाराजांची नृत्य कार्यशाळा उत्साहात

एमपीसी न्यूज – डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या वतीने निगडी येथे गुरु कथक सम्राट पद्मविभूषण पं. बिरजू महाराज आणि पं. शाश्वती सेन यांची कथक नृत्य कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

निगडी येथील नंदकिशोर कपोते सभागृहात ही नृत्य कार्यशाळा घेण्यात आली. शहरातील विविध नृत्य वर्गातील विद्यार्थी मिळून असे एकूण १०० विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत भाग घेतला. पुणे, नाशिक, हैद्राबाद, बेंगलोर, मुंबई याठिकाणांहून विद्यार्थी नृत्य शिकण्य़ासाठी आले होते.

  • पं. बिरजू महाराज आणि शाश्वती सेन यांनी विद्यार्थ्यांना कृष्णवंदना, छेडछाड गतभाव याशिवाय तीनतालामध्ये तिहाई, तुकडे, परमेलुचे विविध सुरेख प्रकार शिकविले. तसेच कथक नृत्यातील सौंदर्य, रियाजाचे महत्व, नृत्यातील बारकावे अशा विविध गोष्टीवर प्रकाश टाकला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त कथक नृत्य शिकण्याकरिता एक योग्य दिशा मिळाली.

दिल्ली येथे जाऊन पं. बिरजू महाराजांकडे नृत्य शिकणे हे सर्वच कलाकारांना शक्य नसते. कलाकारांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ही कार्यशाळा पं. बिरजू महाराजांचे पट्टशिष्य डॉ. नंदकिशोर कपोते यांनी आयोजित केली होती. त्य़ामुळे साक्षात पं. बिरजू महाराजांना समोर पाहून आणि दोन दिवस त्यांचा सहवास मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थी धन्य झाले असे मनोगत डॉ. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले.

  • कार्यशाळेचे संयोजन डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी केले होते. तसेच कार्यशाळेसाठी साथसंगत तबला संतोष साळवे आणि यश कांबळे, हार्मोनियम उमेश पुरोहित यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.