Alandi : पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज-  पूर्व वैमनस्यातून तिघांनी पती-पत्नीला ( Alandi )  मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.24) आळंदी येथे घडली आहे.
 याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.27) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी बाळू धुंडरे एक महिला आरोपी एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू व त्याच्या पत्नीसोबत यांची जुनी भांडण होती. त्याच रागातून आरोपीने फिर्यादी व त्यांचे पती यांना शिवीगाळ केली तसेच मारहाण करत फिर्यादीच्या नाकावर बुक्की मारून नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक केलेली ( Alandi ) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.