Pimpri : पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र कामगार आयुक्त कार्यालय करा

कामगार नेते काशिनाथ नखाते यांची कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी,कामगार नगरी आहे. या ( Pimpri) निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून कष्टकरी, प्रशिक्षित, आय टी आय उत्तीर्ण असे लाखो कामगार  श्रमिक या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून पिंपरी-चिंचवडचा लौकिक असताना आजही करांच्या प्रश्नासाठी  पुणे येथे जावे लागत आहे.

त्यांचा हा त्रास व वेळेची बचत व्हावी म्हणून चाकण, तळेगाव,वासुली, लोणावळा,हिंजवडी या परिसराच्या कामगारांसाठी पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र कामगार आयुक्त कार्यालय स्थापन करून त्यासाठी आवश्यक असलेला पूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यात यावा अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली आहे. यावर त्यांनी सकारात्मकता दर्शवत लवकरच अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात चे आश्वासन दिले.

कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे  कामगार नेते  काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार,सलीम डांगे, माधुरी जलमुलवार, अण्णा  जोगदंड  यांच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन  निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख आहे.

Maval : मित्रांसोबत विसापूर किल्ल्यावर आला आणि भरकटला; किल्ल्यावरून पडलेल्या तरुणाला जीवनदान

शहरात पोलीस आयुक्तालय  आहे, तहसील कार्यालय , न्यायालय ही आहे मात्र कामगार आयुक्त कार्यालय व अधिकारी कर्मचारी नसल्याने कामगारांना त्रास होत आहे. पिंपरी-चिंचवड  शहराचे लगतच्या गावाचे शहरात रुपांतर झाले.  शहराचे विस्तारीकरण झाले शहर झपाट्याने वाढत गेले. आता पिंपरी-चिंचवड सह हिंजवडी, तळेगाव, चाकण, लोणावळा ते वासुलीपर्यंत असा औद्योगिक परिसर वाढत जात आहे.

सदरच्या परिसरामध्ये छोट्या –  मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात येऊन औद्योगिक पट्ट्याचा विस्तार अधिकच प्रमाणात विस्तारत  आहे. पुणे जिल्ह्यातील कामगारांना शिवाजीनगर  येथे कामानिमित्त जाणे  – येणे आणि आपल्या समस्या मांडणे अडचणीचे ठरत असल्यामुळे आणि कामगार संख्या पिंपरी चिंचवड शहरांमध्ये व  परिसरात असल्याने कामगार कायद्याची अंमलबजावणी करणेसाठी  स्वतंत्र कामगार  आयुक्तालयाची स्थापना झाल्यास पिंपरी-चिंचवड सह आजूबाजूच्या परिसरातील कामगारांना त्यांच्या प्रश्न मांडण्यासाठी त्यांचे औद्योगिक न्यायालयाचे खटले, दावे, निवाडे, तक्रारी आणि प्रश्न सोडवण्यासाठी व कामगारांच्या नोंदणीसाठी सोईस्कर व लाभाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र कामगार कार्यालयाची स्थापना करून स्वतंत्र उपायुक्त व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करावी. चर्चेदरम्यान  कामगार मंत्र्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांची  कमतरता आहे ही बाब मान्य आहे.  मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लवकरच नियुक्ती करून  पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र कामकाज सुरू होईल असे आश्वासन त्यानी ( Pimpri) दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.