Alandi Crime News : बांधकाम साहित्य तोडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण

एमपीसी न्यूज – बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे बांधकाम साहित्य तोडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता एकाने जाब विचारणाऱ्यास बांधकामाच्या विटेने मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी चऱ्होली खुर्द येथे घडली.

सुधीर पोपट ताजणे (वय 32, रा. बुरडे वस्ती, चऱ्होली) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निवनाथ शिवाजी झाल्टे (रा. वडगाव रोड, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. चऱ्होली येथे नानाभाऊ दौलत सावंत यांचे बांधकाम फिर्यादी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी फिर्यादी यांची बांधकामासाठी लागणारी काटकोन पट्टी आरोपीने तोडली. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करत बांधकामावर पडलेली वीट फिर्यादी यांना मारून त्यांना जखमी केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.