Alandi : एमआयटी महाविद्यालयामध्ये डॉ. विश्वनाथ कराड करंडक 2024 जल्लोषात साजरा

एमपीसी  न्यूज : सालाबाद प्रमाणे (Alandi) एमआयटी आर्टस् कॉमर्स आणि सायन्स कॉलेज आळंदी मधील नादब्रह्म सांस्कृतिक कक्षाने डॉ. विश्वनाथ कराड करंडक 2024 आयोजित केला. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त हा करंडक 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.

या स्पर्धेसाठी एमआयटी एसीएससी, आळंदी, डॉ. डी.वाय. पाटील एसीएस कॉलेज, पिंपरी, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, लोहेगाव, एमआयटी एओइ कॉलेज, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, भोसरी, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्ट, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय, टी सी कॉलेज बारामती, मॉडर्न कॉलेज गणेशखिंड, माईर्स फिसिओथेरपी, तळेगाव, डॉ डी वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ म्यानेजमेंट अँड रिसर्च,मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी निगडी, सिहंगड ए सी एस कॉलेज, प्रीतम प्रकाश कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, राजगड ज्ञानपीठ कॉलेज, भोर समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, जुन्नर,भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट, आय सी सी एस कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च, अवसारी, श्री शिव छत्रपती कॉलेज जुन्नर, भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज,शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनीरिंग डुंबरवाडी, मॉडर्न लॉ कॉलेज, ए टी एस एस कॉलेज डॉ अरविंद तेलंग सिनियर कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायंस अशा विविध कॉलेजमधून एकूण 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान नृत्य, समूह नृत्य व गायन स्पर्धा (Alandi) घेण्यात आल्या. सोलो डान्समध्ये एमआयटी एओईच्या मैत्रयी मुजुमदारने पहिला क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांक प्रीतम प्रकाश कॉलेजच्या विनायक अदमाने याने पटकावला.

Akurdi : बेदम मारहाण करत तरुणाचा खून;चौघांना अटक

तसेच डॉ. डी वाय पाटीलच्या नतेश बिराजदार आणि मॉडर्न कॉलेजच्या दिक्षा कुलये ला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. ग्रुप डान्समध्ये एम आय टीच्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक तर एमआयटी एसीएससी आळंदीच्या विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. गायन स्पर्धेमध्ये सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या कुणाल होडशीलने पहिला क्रमांक तर एमआयटी एसीएससीच्या आकांक्षा मुसळे हीने दुसरा क्रमांक पटकावला.

सर्व विजेत्यांना रोख रक्कम, पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सोलो आणि ग्रुप डान्सचे परीक्षक मिस जयश्री गाडे यांनी केले. गायनाचे परीक्षक आशुतोष सुरजुसे यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत उप प्राचार्या डॉ. मानसी अतितकर यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन डॉ बी. बी. वाफारे यांचे लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कक्ष विभाग प्रमुख अमित ताले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना आहेर यांनी केले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.