Alandi garbage : विश्रांतवडा कडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याच्या कडेने कचऱ्याचे मोठे ढीग

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण भागातील वडगांव रस्त्यावर चऱ्होली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये दोन ठिकाणी मोठ मोठे कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.(Alandi garbage) हे कचऱ्याचे ढिग पादचारी नागरिकांना रस्त्याच्या कडेने चालण्यासाठी मोठा अडसर ठरत आहे. तेथील कचऱ्यामुळे त्या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधी चा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Drug seized : फरासखाना व बंडगार्डन येथून सुमारे पावणे तीन लाखांचे अंमली पदार्थ जप्त

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडगांव रस्त्यावरील श्री चांगदेव व संत ज्ञानेश्वर भेट स्थान असलेले विश्रांतवड येथे मोठ्या संख्येने वारकरी भाविक येत असतात. (Alandi garbage) या रस्त्यावरून चालणाऱ्या वारकरी भाविकांना त्याचा अडसर ठरू नये.व कचऱ्या पासून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये.यासाठी तेथील कचरा उचलणे आवश्यक आहे, असे तेथील नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.