Drug seized : फरासखाना व बंडगार्डन येथून सुमारे पावणे तीन लाखांचे अंमली पदार्थ जप्त

एमपीसी न्यूज फरासखाना व बंडगार्डन येथे आज (दि.10) या एकाच दिवशी पावणे तीन लाखांचे आंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.(Drug seized) ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक 2 यांनी केली आहे.

यामध्ये पोलिसांनी जाहिदुल मोतेहर मलीक उर्फ आकाश मंडल (वय 24 रा.बुधवारपेठ), अलफहाद वजीर सय्यद (वय 27 रा.पुणे कॅम्प) व शहारुख बाबु शेख (वय 29 रा. कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक पोलिसांच्या तपासी पथकाला गस्त घालत असताना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रांती चौक येथे मंडल (Drug seized) हा संशयीतरित्या उभा असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार पोलिसांनी मंडल याला ताब्यात घेत त्याच्याकडून 76 हजार रुपयांचे 38 ग्रॅम मॅस्केलाईन अंमली पदार्थाच्या 38 गोळ्या 10 हजार रुपायांचा मोबाईल असा एकूण 86 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Water supply : जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशीसह ‘या’ भागातील शुक्रवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार

बंडगार्डन येथील कारवाईमध्ये पुणे स्टेशन परिसरात मोपेडवरून दोन इसम संशयीत रित्या फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता 2 लाख रुपयांचा 10 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ 40 हजार रुपयांची दुचाकी, (Drug seized) 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात फरासखाना व बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.