Water supply : जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशीसह ‘या’ भागातील शुक्रवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार

एमपीसी न्यूज – मुख्य जलवाहिनीला उपवाहिन्या जोडणीचे काम करण्यात येणार आहे. पाईप जोडणीचे काम अंदाजे सायंकाळी 7 पर्यंत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या  क, इ आणि फ  प्रभागातील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डूडुळगाव, चऱ्होलीवडमुखवाडीचोवीसावाडीपांजरपोळसेक्टर 12 यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात शुक्रवार, शनिवारी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि भविष्यातील शहराची लोकसंख्या विचारात घेता शहरामध्ये नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.  शुक्रवार 11  नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून मुख्य जलवाहिनीला उपवाहिन्या जोडणीचे काम करण्यात येणार आहे.  पाईप जोडणीचे काम अंदाजे सायंकाळी 7 पर्यंत  संपण्याची शक्यता आहे.(water supply) यामुळे महापालिकेच्या  क, इ आणि फ  प्रभागातील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डूडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर 12 यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर रात्रीचा व दुसऱ्या दिवशी सकाळचा पाणीपुरवठा उशिरा, कमी दाबाने व विस्कळीत राहील.

Pothole free city : शहर 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त झाले पाहिजे; प्रशासनाला ‘अल्टिमेटम’

नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेस  सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.