Alandi : कोविड काळात सामाजिक कामाचा ठसा उमटविणाऱ्या 101 कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथे महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ पुणे जिल्हा यांच्या वतीने गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या महिला मेळाव्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.

Police transfer :  पोलीस महासंचालकांनी 9 डीसीपी/ एसपी यांची बदली रोखली

कोविड काळात सामाजिक कामाचा ठसा उमटविणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 101 कर्तृत्त्ववान महिलांचा या कार्यक्रमात गुणगौरव हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, माऊली मंदिरात त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी श्रीफळ शाल ज्ञानेश्वरी देऊन केला. मंदिरामध्ये यावेळी आळंदी शहर राष्ट्रवादी पदाधिकारी रुपाली पानसरे, रोहन कुऱ्हाडे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.