Police transfer :  पोलीस महासंचालकांनी 9 डीसीपी/ एसपी यांची बदली रोखली

एमपीसी न्यूज : पोलीस महासंचालक (डीजीपी) यांनी 9 पोलीस उप आयुक्त (डीसीपी)/ पोलीस अधीक्षक (एसपी) यांची बदली रोखली आहे. (Police transfer) याबाबतचे आदेश पोलीस महासंचालक (डीजीपी) यांनी आज दिले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न यामधील तरतुदीनुसार भारतीय पोलीस सेवा( भा.पो.से.) / राज्य पोलीस सेवा (रापोसे) 104 अधिकाऱ्यांची काल सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 रोजी  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने बदली केली आहे. तसेच नऊ राज्य पोलीस सेवा (रापोसे) अधिकाऱ्यांची महाराष्ट्र शासनाने बदली केली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

Pune International Marathon : 36 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

पोलीस अधीक्षक भा.पो.से/ रा.पो.से. या संवर्गातील अधिकाऱ्यांची बदली रोखण्यात आली आहे. प्रशांत मोहिते, नम्रता पाटील, संदीप डोईफोडे, दीपक देवराज, (Police transfer) सुनील लोखंडे, प्रकाश गायकवाड, तिरुपती काकडे,  योगेश चव्हाण व शर्मिष्ठा घार्गे यांची बदली रोखण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.