Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सहाव्या दिवशी सुरूच

एमपीसी न्यूज : आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र (Alandi) यांच्या वतीने दि.15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा सहावा दिवस सुरू आहे. महाद्वार चौकात हभप मोहनानंद महाराज ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे हे बेमुदत उपोषण चालू आहे.

PCMC : महापालिकेच्या वतीने ‘’जल्लोष शिक्षणाचा 2024’, विद्यार्थी करणार विविध कौशल्यांचे सादरीकरण

या उपोषणाच्या सहाव्या दिवशी सुद्धा इंद्रायणी जलप्रदूषणामुळे फेसाळलेली होती. एकीकडे जलप्रदूषणा संदर्भात उपोषण तर दुसरीकडे इंद्रायणीच्या नदीपात्रात दूषित काळवंडलेले पाणी व फेस अशी सद्य परिस्थिती दिसून येत आहे.

इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठी चाललेल्या उपोषणाची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली (Alandi) असून व्यंकटेश दुर्वास जिल्हा सह.आयुक्त नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे त्यासंदर्भात (काल दि.20) पत्र उपोषणकर्त्यांना मिळाले आहे. परंतु, सद्यस्थितीत वारंवार जलप्रदूषणामुळे येणाऱ्या फेसाची दखल प्रशासने घेतली का? उपोषणाच्या सलग सहाव्या दिवशी सुद्धा इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.