Pune : रामचरित्रात सन्मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य – डॉ. कुमार विश्वास

एमपीसी न्यूज : “प्रभू श्रीरामांसह रामकथेतील (Pune) प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकायला मिळते. मूल्यांची, संस्काराची शिकवण मिळते. संपूर्ण जगाला सन्मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य रामचरित्रामध्ये आहे. त्यामुळे आपल्या घरातील रामायण, भगवद गीता, महाभारत आदी साहित्य वाचायला हवेत. आपल्या आयुष्याचा नेमका उद्देश काय आहे, याचे उत्तरही आपल्याला रामकथेतून मिळते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय रामकथेच्या दुसऱ्या दिवशी रामभक्त पुणेकरांनी मोठी गर्दी केली. टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर होत असलेल्या या कार्यक्रमावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, हभप योगिराज महाराज गोसावी पैठणकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, साध्वी वैष्णव दीदी सरस्वती, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, उपाध्यक्ष राजेश पांडे, हेमंत रासने, दादा वेदक, मा. का. देशपांडे, पतित पावन संघटनेचे नितीन सोनटक्के, उद्योजक रविंद्र रांजेकर, प्रसाद देशपांडे, नंदू घाटे, सारंग काळे आदी उपस्थित होते.

Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सहाव्या दिवशी सुरूच

डॉ. कुमार विश्वास म्हणाले, ” प्रत्येकाच्या मनामनात आणि (Pune) हृदयात रामकथा आहे. भारतीयांच्या ‘डीएनए’मध्ये रामकथा सामावलेली आहे. कलियुगाच्या वृक्षावर बसलेल्या संशयरूपी पक्ष्याला दूर करणाऱ्या या रामकथेचे संजीवनी युवकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. राम चराचरात आहे. तोच सृष्टी व सृष्टा आहे. दृष्टीही तोच आणि द्रष्टाही तोच आहे. सुरुवात आणि अंत देखील तोच आहे. मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजा कसा असावा, याचे उत्तम उदाहरण आहे. लक्ष्मण, भरत बंधुत्व कसे जपावे, हे शिकवतात. दलित, वंचित, वनवासी व अन्य लोकांशी राजा म्हणून कसे वागावे, हे राम आपल्याला केवट, माता शबरी यांच्याशी असलेल्या नात्यांतून समजावून सांगतात.”

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकणे, ही पुणेकरांसाठी पर्वणी आहे. अयोध्येतील राममंदिराची नयनरम्य प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ही प्रतिकृती सोमवारपर्यंत (दि. 22) राहणार असून, अधिकाधिक पुणेकरांनी या रामकथेचा आस्वाद घ्यावा, तसेच ही प्रतिकृती पाहण्यासाठी यावे..” असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.