Alandi News : नागरिकांच्या रहदारीस अडसर ठरत आहेत फुटपाथवरील अतिक्रमणे

एमपीसी न्यूज -आळंदी येथील वडगांव रस्ता, मरकळ रस्ता तसेच संत गुलाबराव महाराज ट्रस्ट संस्था  इ. ठिकाणच्या फुटपाथ वर मोठ्या प्रमाणात विविध दुकानांची, टपऱ्यांची अतिक्रमणे झाली असून शालेय विद्यार्थ्यांसह (Alandi News ) नागरिकांना सुध्दा फुटपाथवरून  ये जा करण्यासाठी त्याचा अडसर होत आहेत.

तर काहींनी विद्युत डीपी जवळच टपऱ्या, दुकाने थाटली असून पालिकेच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या भिंती लगत रस्त्यावर सुध्दा अतिक्रमणे वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही ठिकाणी पालिकेच्या जागेत काहींनी अतिक्रमणे केली असल्याने त्याची चर्चा एका कार्यक्रमा वेळी रंगली होती.

सद्यस्थितीत ठिकठिकाणी आळंदी शहरात फुटपाथ वरील अतिक्रमणे वाढलेली दिसून येत आहेत.
नागरिकांना काही फुटपाथ वरील अतिक्रमणांमुळे चालणे ही अशक्य झाले आहे.

Breaking News : किवळे येथे एक्सप्रेस हायवेवर वाहनाला आग

तसेच लग्नसराई मुळे सुद्धा ठिक ठिकाणी काही कार्यालयाच्या बाहेर जवळील फुटपाथ वर काहींनी त्यांची चारचाकी वाहने लावल्याने फुटपाथ वरून ये जा करण्यासाठी नागरिकांस त्याचा अडसर (Alandi News ) निर्माण होत आहे. मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या कार्यकालात वेळोवेळी फुटपाथ वर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जात होती.
नागरिकांच्या रहदारी करता फुटपाथ अतिक्रमण मुक्त होत होता.सद्यस्थितीत फुटपाथ वरील अतिक्रमणा विरोधात पालिका प्रसाशना कडून योग्य ती कारवाई व्हावी अशी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.