Nigdi News : गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त निगडीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज –  निगडी प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दिनांक 12 ते 18  फेब्रुवारी या दरम्यान विविध (Nigdi News) धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष रामभाऊ पिसे यांनी दिली आहे.

या धार्मिक कार्यक्रमात रविवारी (दि.12) सकाळी सात वाजता श्रींच्या पादुका व मूर्तीवर उद्योजक अभय असलकर, योगेश निमोदिया यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक होईल.सकाळी सात  ते दुपारी तीन वाजताच्या दरम्यान गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक  पारायण, तीन वाजता भजन, संध्याकाळी पाच ते आठ वाजता प्राधिकरणातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.तसेच दिनकर पुणतांबेकर  निलेश शिंदे यांच्या हस्ते आरती होईल.

 

Alandi News : नागरिकांच्या रहदारीस अडसर ठरत आहेत फुटपाथवरील अतिक्रमणे

त्यानंतर सोमवारी (दि.13) प्रगट दिनी पहाटे पाच ते साडे सहा वाजता काकड आरती, तसेच सकाळी सात ते साडे नऊ यावेळेत सीमा यशवंत दिघे, प्रेमा गणेश हेगडे,कल्याणी रसिक पिसे यांच्या हस्ते महापुजा महाभिषेक व आरती होणार आहे. या कार्यक्रमात पुर्ण सहा दिवस महाआरती, प्रसाद, भजन, प्रवचन,महाअभिषेक,रुद्राभिषेक यांची रेलचेल असणार आहे.

याबरोबरच प्रकटदिनी सोमवारी  सकाळी 9  ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.याबरबरच भाविकांना डॉ अनघा राजवाडे व सहकारी शेगांवच्या महंता हा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रमाचा देखील आनंद घेता येणार आहे. पुढील शनिवारी महाशिवरात्रीचा महाअभिषेक, रुद्राभिषेक याने याधर्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमांचा (Nigdi News) भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.