Alandi News : सिद्धार्थ ग्रुप च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

एमपीसी न्यूज- काल (दि.17 रोजी) आळंदी मधील सिद्धार्थ ग्रुपने जातीय सलोखा (Alandi News) जपत आळंदीतील मुस्लिम बांधवा साठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

सिद्धार्थ ग्रुपचे या अयोजनाबाबत चे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे.समाजात एकता ,समतेचा संदेश जावा यासाठी कार्यरत असणाऱ्या या ग्रुपच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. समाजा मध्ये सलोखा जपला जावा यासाठी सिद्धार्थ ग्रुपची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. आळंदीकर मुस्लिम बांधवांनी यासाठी सर्व भीमसैनिकांचे आभार मानले. यावेळी रवींद्र रंधवे,अक्षय रंधवे, विश्वजीत थोरात ,योगेश रंधवे, राजेंद्र रंधवे,राहुल रणदिवे, निखिल रणदिवे, हर्षल थोरात , अनिकेत गायकवाड,पोर्णिमा रंधवे, ऋतुजा रंधवे,वैष्णवी रंधवे  ,स्वरूपा पाटोळे. तृप्ती थोरात. ज्ञानेश्वर बनसोडे.जालिंदर जाधव (पोलीस)हे  उपस्थिती होते.

Today’s Horoscope 18 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाच अनुकरण करत  इफ्तार पार्टी केल्याबद्दल आळंदीतील मुस्लिम बांधवांनी सिद्धार्थ ग्रुपचे आभार मानले.याबाबत माहिती आरिफ शेख यांनी (Alandi News)  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.